“एस वी ए एम प्रोडक्शन” निर्मित “अरे घंटा” या हिंदी म्युजिक अल्बम साँग चे पोस्टर लाँच.

0

मुंबई (प्रतिनिधी-राजेंद्र बोडारे)
“एस वी ए एम प्रोडक्शन” निर्मित “अरे घंटा” या हिंदी म्युजिक अल्बम साँगचे पोस्टर नुकतेच वेस्टर्न इंडिया फिल्म एण्ड टीवी प्रोड्यूसर्स एसोसिएशन अध्यक्ष आदरणीय श्रीयुत संग्राम जी शिर्के तसेच जनरल सेक्रेटरी श्रीयुत दिलीप दळवी यांच्या शुभ हस्ते प्रकाशित करण्यात आले.अध्यक्ष शिर्के साहेब यांनी “अरे घंटा” गाणे ऐकून गोड स्मित हास्य दिले आणि त्यांना दादा कोंडके यांच्या गोल्डन जमान्यातील गाण्यांची आठवण आली. गीतकार राजेंद्र बोडारे आणि संगीतकार श्रीहरि वझे यांचे खुप खुप कौतुक करुन हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच एस वी ए एम प्रोडक्शन निर्माता शशिकांत अंकुश यांनी सुद्धा सर्वांचे आभार व्यक्त करून लागोपाठ अशी एकापेक्षा एक सरस गाणी लाँच करण्यात येतील असे याप्रसंगी जाहीर केले. “अरे घंटा” हे हिंदी गाणे एस वी ए एम प्रोडक्शन युट्यूब चॅनल वर लाँच केले आहे त्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील लोकांचा खुप खुप छान प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here