मनमाड येथे श्री शनी जयंती उत्सव संपन्न

0

मनमाड :  शनी जयंती निमित्त मनमाड शहरातील प्राचीन श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर व शनी मंदिर येथे जयंती सोहळा पार पडला यावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना नाशिक जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
श्री दक्षिणमुखी हनुमान भक्त मंडळाच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. मंदिराचे व्यवस्थापक किशोरभाऊ राजगुरू यांनी फरहान (दादा) खान यांचा सत्कार व स्वागत केले. आदरणीय फरहान दादा खान यांनी लवकरच मंदिराचे सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली.
श्री शनी जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, मोठ्यासंखेने भाविकांनी महाप्रसादाचे लाभ घेतले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, बबलूभाऊ पाटील, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगरसेवक पिंटू शिरसाट, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, ज्येष्ठ नेते नानाभाऊ शिंदे, सुनीलभाऊ पाटील, लाला नागरे, विशाल सुरवसे, रवी खैरनार, धनंजय आंधळे, अमोल दंडगव्हाळ, सनी बागुल, ललित रसाळ, हर्षल पाटील, कुणाल विसापूरकर, युवासेना विभागप्रमुख सचिन इमले, विलास परदेशी, पिंटू गुजराथी, सूमित अगरवाल, शुभम शर्मा, गुड्डू जाधव व महिला आघाडी विद्याताई जगताप, संगीता बागुल, पूजाताई छाजेड आदींसह मोठ्या संख्येने शनी भक्त , हनुमान भक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here