
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यसमितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेऊन आगामी निवडणुकांचे नियोजन तथा पक्षीय कार्यक्रम ठरवण्यात आले.पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सर्वसामान्यांसाठी अनेक लोक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. ही कामे सामान्य माणसापर्यंत नेऊन निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन मा. जे.पी. नड्डाजी यांनी केले. त्यांच्या आवाहनाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, तरुण चुग, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी.रवी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ,पंचायती राज राज्य मंत्री कपिल पाटील,केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड,राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, सुनील देवधर, तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, मुंबई शहर अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, विजय चौधरी, रवीजी अनासपुरे तसेच राज्यातील मंत्री, प्रदेशपदाधिकारी, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते.
