कलाभूषण आर्ट आयोजीत एक चित्र हजार शब्दांचे असा अविस्मरणीय चित्रकलाप्रदर्शन सोहळा नुकताच संपन्न.

0

मुंबई : (डोंबिवली-प्रतिनिधी भूषण जमदाडे)
कलाभूषण आर्ट आयोजीत एक चित्र हजार शब्दांचे या संकल्पनेतून साकारलेला भव्य असा अविस्मरणीय चित्रकलाप्रदर्शन सोहळा नुकताच आनंद बाल भवन, दत्त नगर, डोंबिवली (पूर्व) येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या चित्रकलाप्रदर्शनाचे उद्घाटन आणि दीपप्रज्वलन सन्मा.रविंद्र चव्हाण (महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री), महेश्वर भिकाजी तेटांबे (दिग्दर्शक,पत्रकार), प्रभाकर मोरे (अभिनेता,हास्यजत्रा फेम), सौ.प्रणाली सुरेश निमजे (अभिनेत्री,मॉडेल), प्रभू कापसे (चित्रकार, संपादक- डोंबिवलीकर), एकनाथ पाटील (कल्याण तालुका प्रमुख) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने आपली सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत असतो आणि याच अनुषंगाने त्याला स्फूर्ती मिळते ते कलेची, मग ती कला कोणतीही असो चित्रकला, संगीत, नृत्य, लेखन, अभिनय किंवा इतर कोणतीही आणि याच कलेच्या प्रेरणेतून साकारली गेलेली रचना म्हणजे एक चित्र हजार शब्दांचे. प्रगती महाविद्यालयात आपलं बारावीपर्यंत शिक्षण पुर्ण करणाऱ्या भूषण जमदाडे या युवा चित्रकाराने आई सौ.संध्या निलेश जमदाडे यांच्या आशीर्वादानेच आपल्या कौशल्यपूर्ण संकल्पनेतून रेखीव आणि हुबेहूब अशी प्रशंसनीय चित्रे तयार करून त्याचं प्रदर्शन मांडून समस्त डोंबिवलीकरांना आणि मुंबई महाराष्ट्रातील तमाम कलाप्रेमींना कलेची पर्वणीच प्रदान केली आहे. त्यांत प्रामुख्याने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, प्रसिद्ध क्रिकेटपटू, प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, तसेच काही देव-देवतांची अशी अनेक चित्रे भूषण जमदाडे यांनी आपल्या संकल्पनेतून रेखाटून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. द्विदिवसिय चालणाऱ्या या कलाप्रदर्शनाला सनीभूषण मुणगेकर (अभिनेता-अलबत्या गलबत्या फेम), दिपश्री कवळे (अभिनेत्री), अमर पारखे (लेखक, दिग्दर्शक), लीना पालेकर (अभिनेत्री) सौ.शितल ढवळे (मुख्याध्यापिका-श्री.गणेश विद्यामंदिर), रांगोळीकार राम जाधव, आकाश देसले (शिवसेना, देसलेपाडा), शिवगर्जना प्रतिष्ठान-शिवगर्जना मर्दानी तालिमचे यश राजे, रोहन मोरे, निनाद बने आदी मान्यवरांनी आपली वंदनीय उपस्थिती दर्शविली. दोनदिवसीय चालणाऱ्या या चित्रकला प्रदर्शनासाठी राजवीर जाधव (संकलक, लेखक,दिग्दर्शक), गुंजन विलास मेंढे (मॉडेल, रंगभूषाकार) आणि सागर सातपुते (अभिनेता) यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here