नाशिक जिल्ह्यात सहा लाख आयुष्यमान कार्ड वितरित:- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

0

नाशिक : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) च्या आढावा बैठक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सदर बैठकीत आरोग्य, वीज, पाणी, रस्ते आदी प्रश्नांवर या बैठकीत गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.तसेच आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येत असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये साधारण सहा लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांना आयुष्मान आरोग्य कार्डाचे वितरण करण्यात आले अशी माहिती डॉ.भारती पवार यांनी दिली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध व राहील या दृष्टीने आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथर डी.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, कृषी अधिकारी विवेक सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक माळुंदे, स्मार्ट सिटीचे सुमंत मोरे, निर्देशित सदस्य राहुल केदारे, हितेश पगार,सौ. अलका झोंबाड आदींसह सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here