राजगृह बुद्ध विहारात वैशाख पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

0

नाशिक : विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध यांच्या 2567 व्या जयंतीनिमित्त वैशाख पौर्णिमा (दि 5मे) रोजी शहरातील राजीव नगर वसाहत राजगृह बुद्ध विहार येथे महाप्रजाप्रति महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सामूहिक ध्यानधारणा, सामूहिक अष्टशील ग्रहण व सूत्रपठन तसेच भगवान बुद्ध जीवन संदेश धम्म रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते, यावेळी शेकडो महिलांच्या उपस्थितीत परिसरात धम्म रॅली काढण्यात आली.यावेळी मोक्ष फाउंडेशनच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृतीपर कार्यक्रमातून प्रबोधन करण्यात आले यावेळी डॉ. रेंने व मोरे यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.प्रदीपजी पोळ उपआयुक्त आदिवासी विकास ठाणे. मा.मोहनभाऊ अडांगळे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गीता ताई गायकवाड उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या संयोजिका शालिनीताई शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण काऊतकर यांनी केले तर राजीव नगर येथील महाप्रजापती महिला मंडळ,राजगृह बुद्ध विहार समिती व रमाई महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here