
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी AIIMS, ऋषिकेश द्वारे आयोजित Y20 Consultations कार्यक्रमात भाग घेतला आणि G 20 राष्ट्रांमधील तरुणांना संबोधित केले. त्यांच्यासोबत “वसुधैव कुटुंबकम” हे तत्व सामायिक केले आणि संपूर्ण जग एकमेकांशी जोडलेले असताना आजच्या जगात त्याची गरज आहे असेही सांगितले मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली व केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर जी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची प्राचीन तत्त्वे पुढे नेत आहोत आणि आमच्या युवकांच्या सक्रिय सहभागाने निरोगी आणि समृद्ध जगाची वाट पाहत आहोत असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
