
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज एम्स ऋषिकेश,उत्तराखंड च्या सर्व विभाग प्रमुखांसह आढावा बैठक घेऊन पुनरावलोकन दरम्यान दुर्गम भागात वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यासारख्या संस्थेच्या सध्याच्या आणि आगामी उपक्रमांवर चर्चा केली आणि रुग्णांशी संवादही साधला.मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मा.केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया जी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
