खेळ आणि व्यायाम निरोगी आयुष्यासाठी गरजेचे:- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

0

वणी : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत खासदार चषकाचे दिमाखदार उदघाटन वणी येथे करण्यात आले. संताजी युवक मित्रमंळ व एकलव्य फ्रेंडस सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार चषाकाचे आयोजन 3 ते 6 मे या कालावधीत करण्यात आले आहे. स्पर्धेत विजेत्यांना पारीतोषिक व ट्राफीज असे स्वरुप आहे. खेळांमुळे संघटन शक्ती वाढुन शारीरीक विकास होतो.एकोप्याची भावना वाढीस लागते व अशा स्पर्धांच्या माध्यमातुन उदयोन्मुख खेळाडुंना प्रेरणा मिळते व यातुनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडु घडतात त्यामुळे अशा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रोत्साहन द्यावे असे आव्हान नामदार भारतीताई पवार यांनी केले.माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी नेहमीच देशवासियांना खेळात भाग घेण्यास नेहमीच प्रेरित केले आहे. अशा स्पर्धेमुळे लोकांची खेळाकडे आवड वाढते. या स्पर्धेत विविध क्षेत्रातील संस्था ज्या प्रकारे सहभागी होत आहेत, ते कौतुकास्पद आहे असेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले यावेळी सांगितले.भारतीताई पवार यांचे हस्ते बॕटींग करुन औपचारीक उदघाटन सामन्याचे करण्यात आले.यावेळी योगेश बर्डे, कुंदन जावरे, किरण गांगुर्डे , राकेश थोरात ,संदिप पवार ,आबा मोर ,भरत शिरसाठ ,विरेन्द्र खैरनार , विनायक क्षीरसागर,कैलास धुम ,पियुष पारख ,अंकित दोशी, प्रकाश ठाकरे ,प्रशांत समदडीया ,मयुर जैन ,निखील कटारीया ,गणेश पैठणे ,गणेश ठाकरे ,बाळा तपासे ,किरण धुळे ,घनशाम शर्मा , प्रविण दोशी ,मनिष बोरा ,विजय बर्डे ,सतिष जाधव ,संकल्प गांगुर्डे , अमोल देशमुख , उत्तम भरसठ,अनिल मोहीते, भरत पवार ,गौतम गांगुर्डे ,शशी गांगुर्डे ,सुनिल बेलखेडे ,ललीत जाधव,संतोष पवार ,निखिल खरोटे ,नयन जाधव ,रामभरोसे ,अमोल भरसठ, विशाल भोये, निलेश वाघ सर्कल डिबी केसरे , तलाठी केंग, भास्कर कोरडे , अजय पवार, योगेश रेहरे, चेतन चौधरी, व विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here