घुलेंनी जिल्हा बँकेच्या आणि पाथर्डी मार्केट कमेटीच्या पराभवाचा वचपा काढत शेवगाव मार्केट कमेटीच्या निवडनुकीत १८-0 ने महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेरमन पदाच्या निवडणूकीत एका मताने झालेला पराभव,आणि पाथर्डी मार्केट कमेटीच्या निवडणूकीत १७ -१ ने झालेल्या पराभवाचा वचपा काढत राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि अँडहोकेट प्रतापराव ढाकणे यांनी शेवगाव क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत १८- 0 ने भाजपचा पराभव करून नुकत्याच झालेल्या दोन्ही निवडनुकीतील पराभवाचा हिशोब चुकता केला आहे. शेवगाव क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत आमदार मोनिकाताई राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाला एकही जागा न मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडी प्रणित राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाच्या सर्वच्या सर्व आठरा उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे सहकारी सर्व साधारण गटातून कसाळ एकनाथ दिनकर(६३१मते), खंबरे गणेश बाबासाहेब (६२६मते),धस अशोक अण्णासाहेब (६२९मते),पटेल जमिर अब्बास(६१९मते), बेडके राहुल शंकर(६३२मते), मडके अनिल बबनराव(६२७मते),मडके नानासाहेब बबन(६१५मते), महिला राखीव गटातून कातकडे चंद्रकला श्रीकिसन (६८३मते),लांडे रागीणी सुधाकर(६८२मते), इतर मागासवर्गीय गटातून पातकळ हनुमंत बापुराव(६६४मते), भटक्या विमुक्त गटातून दौंड राजेंद्र शिवनाथ(६७९मते),ग्रामपंचायत सर्व साधारण गटातून कोळगे संजय मोहन(५३७मते), मेरड अशोक रामभाऊ(५१५मते),ग्रामपंचायत जाती जमाती गटातून घाडगे अरुण भास्कर(५४९मते),ग्रामपंचायत दुर्बल घटक गटातून अंधारे प्रीती रामभाऊ(५३४मते),व्यापारी आडते गटातून कुरेशी जाकिर शफी(१५३मते), तिवारी मनोज काशिनाथ (१५८मते), हमाल-मापाडी गटातून काळे प्रदिप नानासाहेब (१८९मते) मिळवून घुले-ढाकणे यांच्या ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांच्या पराभूत झालेल्या आदिनाथ शेतकरी मंडळाच्या उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आधाट सोमनाथ(२१६), कुलट ज्ञानेश्वर(२०५),जुंबड हरीभाऊ(२१०), तेलोरे भगवान(२०३), भागवत जगन्नाथ(२१२),वाघ सचिन(२०७),शेख मुसाभाई(२०१), दिवटे सुनंदा(२०७),सुकाशे रूख्मिणी(१८६), जमधडे सोपान(२२१),बेळगे हनुमंत(१९८), कातकडे संभाजी(३०२),विखे दिलिप(२५१), खंडागळे सुखदेव(२७७),पवार वर्षा(२९६),घनवट खंडू(२६),फडके अमोल(२८),पारठे नवनाथ(३०),आणि अपक्ष गव्हाणे वसंत(५),भुसारी शिवाजी (९) याप्रमाणे उमेदवारांना मते मिळाली आहेत.ही संस्था स्व.मारुतराव घुले पाटील (मालक)यांनी स्थापन केल्यापासून ती आज तागायत घुले बंधुच्याच ताब्यात राहिलेली आहे.शेवगाव तालुक्यात माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि प्रतापराव ढाकणे यांच्या राष्ट्रवादीचीच पुन्हा सत्ता असल्याचे सिद्ध झाले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here