धम्मगिरी योग महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

0

नाशिक : दिनांक 1में 2023 रोजी धम्मगिरी सामाजिक सांस्कृतिक संस्था नाशिक संचलीत धम्मगिरी योग महाविद्यालयात महाराष्ट्र दिन -कामगार दिन साजरा करण्यात आला.श्री जिवराम गावले (जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज योग शिक्षक संघ तथा सेवानिवृत्त कर्मचारी मायको नाशिक )यांचे हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. नितिन रावते सर डॉ. तस्मिना नसरीन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. धम्मगिरी योग महाविद्यालयाचे मार्गदर्शक व अत्तदीप मेडिकोज सोशल वेलफेअर असोसिएशन नाशिक चे विद्यमान अध्यक्ष डॉ. विशाल जाधव यांनी प्रमुख अतिथीचे स्वागत केले. प्राचार्य श्री. यु. के. अहिरे यांनी महाराष्ट्र दिनाचा इतिहास आणि महती याबाबत मार्गदर्शन केले. तर प्राध्यापक. ह. भ. प. राजेंद्र काळे यांनी योग विषयाचे महत्व विषद केले. धम्मगिरी योग महाविद्यालच्या समन्व्यक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गीताताई गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयाचे काशीफ शेख हर्षल पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here