शेवगाव क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सर्व पक्ष एकत्र येऊनही राष्ट्रवादीच्या ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे पारडे जड

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीचा धुराळा उडाला असतानाच शेवगाव क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपासह सर्व पक्ष एकत्र येउनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे पारडे जड झाले आहे. विरोधी भाजपा आणि मित्रपक्षाच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ शेतकरी मंडळाने आव्हाने येथे गणपती मंदिरात प्रचाराचा शुभारंभ केला.केला तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व मतदार संघात प्रचाराच्या दोन फेऱ्या पुर्ण केल्या आहेत. युवा नेते मा.सभापती क्षितिज घुले यांनी दहिगाव, शहरटाकळी, भातकुडगाव गटात सभा घेउन प्रचारात आघाडी घेतली आहे. मुंगी येथे मोठ्या प्रमाणात माजी आमदार चंद्र शेखर घुले पाटील यांच्या अध्यक्षते खाली आणि युवा नेते क्षितीज घुले आणि माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेउन उमेदवारात नवचैतन्य निर्माण केले आहे. शेवगाव तालुक्याच्या पुर्व भागातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, सदस्य,अनेक सहकारी सोसायट्यांचे चेरमन,व्हा.चेरमन ,संचालक हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कल्याणराव नेमाने, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र ढमढेरे, चेरमन सुधाकर गव्हाणे,व्हा.चेरमन कारभारी खरात,जिनिंगचे चेरमन शिवाजी दसपुते, कारभारी खरात हे आवर्जून उपस्थित होते. उमेदवार,गणेश खंबरे, राजेंद्र दौंड यांच्या सह अनेक उमेदवारांनी मतदारांना “कपबशी” या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.बाळासाहेब वडघने,सचिन साळुंखे, हरीभाऊ वडघणे,बप्पासाहेब पावसे,संतोष पावसे,भैय्यासाहेब दसपुते, गुलाब गव्हाणे, सिद्धार्थ दसपुते, शिवाजी गरड,विठ्ठल रकटे,अनिल सुरासे,प्रदिप काटे,सतिश गव्हाणे, गणेश देशमुख, गोविंद सरोदे, राहुल देशमुख, बाबासाहेब तांबे,जनार्दन घोरपडे, अहमदभाई शेख, लालभाई शेख,ईस्माईल शेख, अब्बासभाई शेख,दिपक साळुंखे, बंडू दसपुते, गंगाधर सोनटक्के, चंद्रकांत आदमाने,सुधाकर काटे,संतोष काटे,राजू नरोटे,बाळू देव्हडे,दिपक बटुळे, अर्जुन दराडे, नानासाहेब मडके,एकनाथ कसाळ,हनुमान पातकळ, राम अंधारे या प्रमुख नेत्यासह चापडगाव, हातगाव,गदेवाडी, प्रभुवाडगाव, खामपिंप्री,दहिगाव शे, खडका,मडका ईत्यादी प्रमुख गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मिलिंद गायकवाड यांनी आभार मानले.एकंदरीतच या बाजार समितीची स्थापना(मालक) स्व.मारुतराव घुले पाटील यांनी केली आहे. तेव्हा पासून आजपर्यंत घुले बंधुचीच सत्ता या बाजार समीतीवर राहीलेली आहे.आजपर्यंत बाजार समितीच्या निवडनुकीत अनेक वर्षे विरोध करणाऱ्या विरोधकांना निवडनुकीत भुईसपाट व्हावे लागले आहे हा ईतिहास साक्षी आहे. आमदार मोनिकाताई राजळे यांनी ही बाजार समीती ताब्यात घेण्यासाठी आदिनाथ शेतकरी मंडळाच्या उमेदवारांना चांगली रसद पुरवून निवडनुकीत रंग भरला आहे.अबकी बार… किसकी सरकार… देखते रह जावोगे हा नारा देत आव्हाने येथील गणपतीची आराधना करीत नारळ फोडून रणशिंग फुंकले आहे. मतदार नेमके कोणाला स्विकारतात आणि कोणाला नाकारतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लागले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र जिल्हा सहकारी बँकेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि विजयश्री खेचून आणण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here