
पाचोरे : श्री मल्हारी मार्तंड देवस्थान पाचोरे वणी प्रति जेजुरी आयोजित श्री कुलस्वामिनी खंडेराया चरित्र कथा या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. भारती पवार यांनी सांगितले की खंडोबा महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून वणी पाचोरा येथे प्रति जेजुरीचे मंदिर उभे राहणे हे आपल्यासाठी भाग्याचे असून ज्यांना जेजुरी जाणे शक्य नसेल अशा भक्तांनी प्रति जेजुरी देवस्थानामुळे दर्शन सुलभ होईल. जीवनात साधू संतांचे कार्य खुपं मोलाचे आहे. आज भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून अनेक पाश्चात देशातील लोक भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून त्याचे अनुकरण करताना दिसत आहे. आजच्या पिढीला अध्यात्माची गरज असून आपली प्राचीन संस्कृती व परंपरा याची माहिती होणे खूप गरजेचे आहे .त्यासाठी देशातील साधू, महात्म्यांचे सत्संग खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्या प्राचीन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होईल.
यावेळी ह.भ.प.डॉ.गजानन महाराज काळे, योगेश महाराज गवारे, जिजाबाई गवारे, दिनेश गिरी महाराज, भागवत बाबा बोरस्ते, सतीश मोरे,अल्पेश पारक, संतोष गवारे, रामराव अण्णा डेरे व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
