
खडक माळेगाव : येथे आयोजित कथाकार वैष्णव भूषण सुमित जी महाराज यांची प्रेमपूर्ती संत मिराबाई संगीतमय कथा प्रसंगी डॉ. भारती पवार यांनी उपस्थित सर्व भक्तगणांना संबोधित करतांना सांगितले की आपल्या सगळ्यांसाठीच हा असा अमूल्य ठेवा आहे की या आज होणाऱ्या या अमृतवाणी धारेतून आपल्याला सत्संगद्वारे मिळणारी भक्तीची परंपरा ही अमूल्य आहे.
संत मीराबाई बद्दल बोलाल तेवढे कमी आहे एक महिला म्हणून त्यांचं वेगळंच रूप आम्ही बघतो त्यांची उच्च कोटीची भक्ती आणी शक्तीचा आजही अनुभव येतो असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.यावेळी भागवत बाबा बोरसे, सुवर्णताई जगताप, सतीश मोरे, जगदीश पवार, विक्रांत रायते, दत्ता काका रायते, बाळासाहेब रायते,श्रीकांत रायते, किरण शिंदे अनिल जाधव, नाना जाधव व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
