
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज सोमनाथ येथे सौराष्ट्र तमिळ संगम कार्यक्रमला संबोधित करून विविध स्टॉल्स व प्रदर्शनांना भेट दिली. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली, एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेमुळे विविध राज्यांतील विविध संस्कृतींचा आदर केला जात आहे.तसेच सौराष्ट्र तमिळ संगम या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल डॉ. भारती पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री श्री.भुपेंद्र पटेल जी यांचे आभार आणि अभिनंदन हि केले. यावेळी यावेळी कृषी मंत्री राघव पटेल जी, वन मंत्री श्री मुलुभाई बेरा जी, अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
