शेवगाव क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत राष्ट्रवादीच्या ज्ञानेश्वर शेतकरी मंडळ आणि भाजपच्या आदिनाथ शेतकरी मंडळात जोरदार रस्सीखेच

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) सहकाराचे आगार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ आणि विरोधी भाजपच्या आदिनाथ शेतकरी मंडळ यांच्यामध्ये शेवगाव क्रुषीउत्पन्न बाजार समितीची सत्ता मिळवण्या साठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.सत्ताधारी ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत-सोसायटी सर्व साधारण गटातून अशोक अण्णासाहेब धस,एकनाथ दिनकर कसाळ,गणेश बाबासाहेब खंबरे,अनिल बबनराव मडके,राहुल शंकरराव बेडके,नानासाहेब बबन मडके,जमिर अब्बासमिया पटेल, इतर मागासवर्गीय गटातून हनुमान बापुराव पातकळ,महिला राखीव गटातून सौ.चंद्रकला श्रीकिसन कातकडे, सौ.रागिणी सुधाकर लांडे,भटक्या विमुक्त जाती मधून राजेंद्र शिवनाथ दौंड, ग्रामपंचायत सर्व साधारण गटातून संजय मोहन कोळगे,अशोक रामभाऊ मेरड, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून अरुण भास्कर घाडगे,ग्रामपंचायत दुर्बल घटक गटातून, सौ.प्रिती राम अंधारे, व्यापारी आडते गटातून जाकिर शफी करेशी,मनोज काशिनाथ तिवारी,हमाल मापाडी गटातून प्रदिप नानासाहेब काळे हे निवडणूक लढवित आहेत. तर भाजपच्या विरोधी आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत- सोसायटी सर्व साधारण गटातून तेलोरे भगवान एकनाथ,भागवत जगन्नाथ नामदेव, झुंबड हरिभाऊ भानुदास,शेख मुसाभाई दगडूभाई,वाघ सचिन श्रीरंग,कुलट ज्ञानेश्वर दत्तात्रय,आधाट सोमनाथ मारुती,महिला राखीव गटातून दिवटे सुनंदा रामदास, सुकासे रुख्मिणी विठ्ठल, ईतर मागासवर्गीय गटातून जमधडे सोपान जगन्नाथ ,भटक्या विमुक्त गटातून बेळगे हनुमान भगवान, ग्रामपंचायत सर्व साधारण गटातून विखे दिलिप हरिभाऊ, कातकडे संभाजी दशरथ,अनुसूचित जाती जमाती गटातून खंडागळे सुखदेव माधव, ग्रामपंचायत दुर्बलघटक गटातून पवार वर्षा महादेव ,व्यापारी आडते गटातून घनवट खंडू मोहन,डॉ. फडके अमोल एकनाथ, हमाल मापाडी गटातून पारठे नवनाथ साहेबराव हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत. वसंत दशरथ गव्हाणे, शिवाजी रामा भुसारी हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे नेतृत्व माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि संघर्ष योद्धा केदारेश्वर साखर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे,सभापती युवानेते क्षितिज घुले हे करीत आहेत तर विरोधी भाजपच्या आदिनाथ शेतकरी मंडळाचे नेतृत्व भाजपच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे या करीत आहेत.स्व. मारुतराव घुले पाटील यांनी स्थापन केल्यापासून ही बाजार समीती घुलें बंधुच्याच ताब्यात राहीली आहे.एकूण २५० उमेदवारांनी उमेदवारी अर्जदाखल केले होते पण अनेकांना अर्ज माघारी घेण्यासाठी सांगितल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाल्यामुळे नाराजी चा फटका नेमका कोणाला बसतो यावरच विजयाची बरीचशी गणिते अवलंबून आहेत. जिल्हा सहकारी बँकेच्या चेरमन पदाच्या निवडनुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी घुलेंबंधुना आता ही आयतीच संधी चालून आलेली आहे.ते आता आपल्या भात्यातील नेमका कोणता बाण वापरुन विजय हस्तगत करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवडनुकी पुर्वी हवा निर्माण केलेल्या जनशक्ती मंचाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी भरलेले सर्व उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे दोन्ही मंडळात ही सरळसरळ लढत होत आहे. आमदार मोनिकाताई राजळे आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी ही ३० एप्रिल २०२३ रोजी होणारी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे एकूण १८ जागेसाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची आणि भाजपच्या अस्तित्वाची होणारी लढाई या निवडणुकीत पहायला मिळणार आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here