पाथर्डी क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत जगदंबा महाविकास आघाडी आणि आदिनाथ शेतकरी मंडळात काट्याची लढाई ?

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)नगर जिल्ह्यातील पाथर्डी क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत सत्ताधारी जगदंबा महाविकास आघाडी आणि विरोधी आदिनाथ शेतकरी मंडळ यांच्यात या निवडणूकीत ही काट्याची लढाई होत आहे.राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राजक्त दादा तनपुरे आणि संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वा खालील जगदंबा महाविकास आघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.सोसायटी सर्व साधारण गटातून गोरे भाउसाहेब खेमा,बडे विठ्ठल राधाजी,आव्हाड निळकंठ आनंदराव, देशमुख अरविंद शिवाजीराव, हिंगे शिवनाथ नामदेव, लवांडे रमेश सुर्यभान, शेटे कडुचंद भानुदास, महिला राखीव गटातून सौ.शिरसाट विनिता चंद्रशिंग, सौ.ढाळे सुमन धोंडीराम, ईतर मागासवर्गीय गटातून सौ.म्हस्के मंगल राजेंद्र,भटक्या विमुक्त जाती गटातून श्रीमती शशिकला चंद्रकांत सोलाट, ग्रामपंचायत सर्व साधारण गटातून बडे आदिनाथ विश्वनाथ, टेमकर विलास गंगाधर, ग्रामपंचायत जाती जमाती गटातून बोर्डे शोभा वसंत, आर्थिक दुर्बल घटकातून लाड सुभाष एकनाथ, व्यापारी आडते गटातून मेहेर अजितकुमार सुरजमल, गिते कैलास आंबादास, हमाल मापाडी गटातून केदार बाबासाहेब निव्रुती हे निवडणूक लढवित आहेत.जगदंबा महाविकास आघाडीचे निवडणूक चिन्ह “छत्री” हे आहे.तर विरोधी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वा खालील आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत – सोसायटी सर्व साधारण गटातून नागरगोजे बाळासाहेब मारुती,गाडे नानासाहेब यशवंत,खलाटे वैभव धर्मनाथ,खेडकर जगन्नाथ दादाबा,देशमुख मधुकर शंकर,बर्डे सुभाष रभाजी,रक्ताटे अजय शेषराव, महिला राखीव गटातून लाड स्मीता पांडुरंग,कोलते सुनिता रामनाथ, ईतर मागासवर्गीय गटातून रायकर अरुण गोविंद,भटक्या विमुक्त जाती गटातून लोंढे जिजाबा तात्याबा, ग्रामपंचायत सर्व साधारण गटातून कचरे शेषराव सुर्यभान,राठोड किरण लक्ष्मण, ग्रामपंचायत जाती जमाती गटातून आरोळे रवींद्र बाबुराव, दुर्बल घटक गटातून पालवे नारायण भगवान, व्यापारी आडते गटातून मंडलेचा प्रशांत प्रकाशलाल, आव्हाड कुंडलिक गणपत, हमाल मापाडी गटातून सावंत अशोक दिलीप हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत. आदिनाथ शेतकरी मंडळाचे निवडणूक चिन्ह “कपबशी”हे आहे.एकुण २५६७ मतदार सभासद असुन गेल्या दहा वर्षापासून ही बाजार समिती प्रतापराव ढाकणे यांच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत मतदार नेत्यांनी केलेले आरोप प्रत्यारोप ऐकून नेमका कोणाला कौल देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पाथर्डी तालुक्यातील जवळपास सर्व सहकारी संस्था या आमदार राजळे यांच्याच ताब्यात आहेत फक्त बाजार समीती ही विरोधकांच्या ताब्यात आहे ही सल आ.राजळेंना आहे.म्हणून त्यांनी खासदार सुजय विखे,माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे चेरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या सहमतीने हे समर्थक उमेदवार उभे केले आहेत. मतदार नेमके कोणाला स्विकारतात आणि कोणाला नाकारतात हे घोडामैदान जवळच आहे. जिल्हा बँकेच्या चेरमन पदाच्या निवडणूकीतील पराभवानंतर वैफल्यग्रस्त झालेली महाविकास आघाडी अतिशय आक्रमक झालेली दिसून येत आहे. ही निवडणूक जरी बाजार समितीची असली तरी आगामी विधानसभेच्या निवडनुकीची ही रंगीत तालीम आहे.या निवडनुकीत नेमके कोण बाजी मारतो यावरच पुढील काळातील राजकारणाची राजकीय समिकरणे अवलंबून आहेत. आमदार राजळे, आमदार तनपुरे आणि ढाकणे यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. निवडणूक काळात धोका नको म्हणून दोन्ही गटातील नेत्यांनी संपूर्ण तालुक्यात गोपनीय निरिक्षक नेमले आहेत.त्यांनी दररोजचा गोपनीय अहवाल वरिष्ठांना दिल्यानंतरच पुढील राजकीय वाटचाल केली जाणार आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here