
राज्य : G20 हेल्थ वर्किंग ग्रुपच्या दुसऱ्या बैठकी दरम्यान मा.केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया जी यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ऑन-डिजीटलच्या समारोप सत्राला संबोधित केले. भारताच्या तत्वज्ञाना नुसार “सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया” म्हणजे सर्व सुखी होवोत, सर्व रोगमुक्त होवोत आणि सर्व चांगल्या घटनांचे साक्षीदार होवोत.मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या संकल्पनेनुसार सर्वांनी सार्वभौम बंधुत्वाच्या भावनेने चांगल्या आरोग्याविषयी अधिक जागरूक राहण्याचा संकल्प करूया.
