
सुरगाणा : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज सुरगाणा येथे थोर समाजसुधारक, शेतकऱ्यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे ७० खाटांच्या फील्ड हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा समारंभ डॉ. भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, वैद्यकीय अधिक्षक डॉ. चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रणवीर, तहसीलदार सचिन मुळीक, BDO दिपक पाटील,एन. डी. गावित,रमेश थोरात, ज्ञानेश्वर कराटे, राजू पाटील, कृष्णा बोरसेविजय कानडे शाम पवार ,अमृता पवार, रंजना लहरे, जानकी ताई देशमुख, संजय पवार व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
