0

राज्य : कोविड-19 व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आणि राज्यांमधील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया जी यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्याचे सुचित केले आहे. डॉ.भारती प्रवीण पवार यांनी त्यांच्या भाषणात आरोग्य यंत्रणेने वेळेवर सज्ज राहण्याचे महत्त्व आणि कोविड-19 चे योग्य व्यवस्थापन यावर भर दिला. त्यांनी राज्य सरकारांना प्राधान्यक्रमाने आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी ईसीआरपी-II मधील कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. राज्य सरकारांनी त्यांची देखरेख यंत्रणा अधिक मजबूत करावी आणि येत्या काळात पर्यटनात वाढ होईल हे लक्षात घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना देखील डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here