
आनंदाचा शिधा डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती ला वाटप करा वचिंत बहुजन आघाडी चे शंशिकांत जगताप यांची मागणी ,महाराष्ट्र राज्य सरकारकडे राज्यातील कोणत्याही शिधापत्रिका धारकांनी मागणी केली नसतानाही शासनाने गुढीपाडवा व बाबासाहेब आंबेडकर जंयतीला आनंदाचा शिधा राज्यातील जनतेला रेशन कार्ड वर दिला जाईल असे जाहीर केले होते परंतु ते गोरगरीब जनतेला न मिळणं आशेला लावने अन धूपटने दावने असा प्रकार घडत असेल तर हा पोरकट पणा असल्याचे मत येवला तालुका वंचित बहुजन आघाडी चे शंशिकांत जगताप यानी पञकाद्वारे व्यक्त केले आहे,गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप न झाल्याने जाहीर केल्याप्रमाणे राज्य सरकारचा वतीने गुढीपाडवा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिका धारकांना १०० रुपयात एक किलो साखर,एक किलो रवा,एक किलो खाद्यतेल ,एक किलो चना डाळ असा आनंदाचा शिधा वाटप करण्याचे जाहीर केले होते दिवाळीला आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता त्याच प्रमाणे यावेळीही नुकतीच सरकारने घोषणा केली होती परंतु गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा न मिळाल्याने शिधापत्रिका धारकां मध्ये नाराजीचा सुर दिसून आला रेशन दुकानात जाऊन आनंदाचा शिधा न मिळाल्याने राज्य व केंद्र सरकार अशा घोषणाची अमलबजावणी करू शकले नसल्याने सरकारने महिलांचा दैनंदिन
वापरातील स्वयंपाक वस्तू आणि गॅस सिलेंडर चे दर कमी करण्याची गरज असताना ते दर वाढत आहे ते कमी करण्याची मागणी महिलांकडून होत आहे तरी शासनाचा घोषणाची अमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे शंशिकांत जगताप यानी प्रसिद्धी पत्रकातून नमुद केले आहे
