महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

0

मुंबई : नटवर्य प्रभाकर पणशीकर जयंती निमित्त गुरूवार दिनांक २३ मार्च २०२३ रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ,मिनी थिएटर, ३ रा मजला, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात मंदार व्यास (गायक),, श्रेयस व्यास (गायक) आणि सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला,या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय रानडे यांच्या कडून झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे प्रकल्प संचालक श्री.संतोष रोकडे साहेब,नटवर्य प्रभाकर पणशीकरांची ज्येष्ठ कन्या सौ. जान्हवी पणशीकर सिंह, लेखक दिग्दर्शक महेंद्र पाटील, आय. बी. एन. लोकमत चे वैभव राणे आदी मान्यवरां कडून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करण्यात आले.मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन पु. ल. देशपांडे कला अकादमी चे प्रकल्प संचालक श्री. संतोष रोकडे साहेब यांनी स्वागत केले.सौ जान्हवी पणशीकर सिंह यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. श्री. संतोष रोकडे साहेबांनी मार्गदर्शनपर भाषण केले.या कार्यक्रमात मंदार व्यास (गायक),, श्रेयस व्यास (गायक) यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नाटकातील नाट्यसंगीत व शास्त्रीय गायन सादर केले.गौरी कुलकर्णी राणे (तानपुरा), निनाद कुणकवळेकर (तबला), अथर्व चांदोरकर (हार्मोनियम ) यांनी त्यांना साथसंगत केली.तसेच प्रशांत तांबे, लेखक , दिग्दर्शक ज्ञानेश्वर शिंदे, आकाश उबाळे,कवियीत्री दया चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते.त्यांना पुषपगुच्छ देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले.अमेय रानडे यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे संयोजन आरयन देसाई यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here