मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर ,मुंबई येथे

0

मुंबई : मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर ,मुंबई येथे करण्यात आले असून. या महोत्सवमध्ये भारतीय तसेच परदेशी भाषिक लघुपट पाठवू शकतात. फक्त मराठी व हिन्दी लघुपट वगळता इतर भाषिक लघुपटांना ” ईंग्रजी सबटायटल्स” असणे बंधनकारक आहे. या महोत्सवमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख २३ एप्रिल २०२३ असून सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक ईत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच भाग घेणाऱ्या सर्व लघुपटांना प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. अधिक माहितीकरता 7021642822 / 8108889100 यावर संपर्क साधायचा आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here