यहोवाच्या साक्षिदारा कडून येशुच्या म्रुत्युचा स्मारक विधी भेंडे येथे संपन्न !

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) गुड फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर येशुच्या म्रुत्युचा स्मारक विधी यहोवाच्या साक्षिदारा कडून मोठ्या उत्साहात संपन्न.अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथिल श्रीकृष्ण लाँन्स येथे यहोवाच्या साक्षिदारा कडून येशुच्या म्रुत्यु चा स्मारक विधी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये गीत,प्रार्थना, वचने,बायबल मधिल काही उतारे वाचून दाखवण्यात आले. भाकरीबरोबर द्राक्षरस ही सर्वत्र फिरवण्यात आला.येशु जिवंत असताना त्यांनी प्रत्यक्ष जो विधी साजरा केला होता अगदी त्याच प्रकारे हा विधी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मोठ्या शांततेने संपन्न झाला. या कार्यक्रमास देवदान हिवाळे,सुजित मकासरे,ज्योयेल नागावकर,मार्क गोन्साल्विस,अशोक सुर्यवंशी, संदिप खरात हे उपस्थित होते. नेवासा-पाथर्डी तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here