
भोपाळ : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत 150 खाटांची सुविधा असणारे क्रिटिकल केअर ब्लॉकच्या भूमिपूजन आणि पायाभरणीचा समारंभ संपन्न झाला.यावेळी मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग,मा.महापौर मालती राय आणि एम्सचे प्रमुख उपस्थित होते.मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि मा.आरोग्यमंत्री श्री. मनसुख मांडवियाजी यांच्या मार्गदर्शनानुसार रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत.
