
दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मध्य प्रदेशचे मा. राज्यपाल श्री. मंगूभाई पटेल यांची राजभवनात भेट घेतली. चर्चेदरम्यान राज्यपालांनी 2047 पर्यंत सिकलसेल ॲनेमिया दूर करण्याच्या भारत सरकारच्या ध्येयाबद्दल आणि त्या दिशेने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची विशेष माहिती घेतली.मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार आरोग्य सुविधांसह आदिवासी समाजाचे सर्व हित जपण्यासाठी कार्यरत आहे.
