कोपरे येथे अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या कोपरे येथील दक्षिण मुखी मारुती मंदिरात ३०मार्च ते ६एप्रिल या काळात ह.भ.प.सोपान महाराज ढाकणे आणि भाउसाहेब महाराज भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज काकडा भजन,ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरिकिर्तन आणि हरीजागर इ.कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.सर्व ह.भ.प.शिवाजीराव वाघ,महादेव महाराज आव्हाड, ठकाजी दींडे,प्रल्हाद महाराज आंधळे,भाउराव महाराज राजळे,सुर्यभान महाराज केसभट,भालसिंग महाराज यांची प्रवचने तर सर्व ह.भ.प. अभिमंन्यु महाराज भालसिंग, वैष्णवी महाराज वाघमोडे, महेश महाराज आव्हाड, शंकर महाराज भागवत,कु.प्रियंका ताई रुपनर,ज्ञानेश्वर महाराज बटुळे, प्रतिभाताई कदम यांची किर्तने होणार आहेत.बुधवार दि.५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ते६ या वेळेत दिंडी प्रदक्षिणा व ग्रंथ मिरवणूक होणार आहे. चैत्र पौर्णिमेला गुरुवार दि.६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते११ ह.भ.प.लक्ष्मण महाराज कराड यांचे काल्याचे किर्तन होउन मदनलाल शर्मा, भागवत ढाकणे, निव्रुती ढाकणे यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.ज्ञानेश्वरी व्यासपीठ ह.भ.प. आबाजी महाराज आंधळे हे चालवणार आहेत.मंडप आणि साउंड सिस्टीम ग्रामपंचायत सदस्य शंकरराव उघडे यांच्या जयमल्हार मंडप मार्फत दिली आहे.सकाळचे अन्नदाते सोपान उघडे,भाउसाहेब व अण्णासाहेब उघडे,मळू,आश्रू, विष्णू उघडे,उत्तम ढाकणे,काशिनाथ आव्हाड, जगन्नाथ आव्हाड, तुकाराम आव्हाड, नवनाथ आव्हाड, शंकर उघडे,लहानू उघडे,पोपट उघडे,बोजी उघडे,नानाभाउ माने,अशोक आव्हाड, आंबादास आव्हाड, सोमनाथ आव्हाड, बाबासाहेब आव्हाड, विष्णु आव्हाड, एकनाथ माऊली आव्हाड ,नामदेव आव्हाड,शिवनाथ आव्हाड गुरुजी, सुभाष आव्हाड हे आहेत तर सायंकाळ चे अन्नदाते म्हातारदेव वाघमोडे, रामभाऊ वाघमोडे, सदाशिव वाघमोडे, धर्मनाथ वाघमोडे,महादेव वाघमोडे, पोपट वाघमोडे, सुभाष उघडे,राजू उघडे,नाथा खरात,भागिनाथ दिंडे,श्रीपती उघडे,बबनराव उघडे,भाउसाहेब उघडे,शिवाजी उघडे,म्हातारदेव उघडे,संभाजी कि.आव्हाड, वसंतराव आव्हाड, राजेंद्र आव्हाड, अजिनाथ आव्हाड, शहादेव खेडकर, महादेव आव्हाड, भाउसाहेब आव्हाड, नामदेव वि.आव्हाड, सोपान आव्हाड, एकनाथ अहिलाजी आव्हाड, भानुदास अ.आव्हाड हे आहेत तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरे ग्रामस्थ आणि भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी/सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here