तुमच्या खात्यात अनोळखीकडून पैसे जमा ! हे एक नवीन सायबर स्कॅम ! – अॅड. चैतन्य एम. भंडारी

0

मुंबई : जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे: नुकताच माझ्या एका मैत्रिणीने एक अनुभव शेयर केला की तिच्या भावाच्या खात्यात कुणीतरी अनोळखी नंबरवरून पैसे जमा झालेत आणि तो मेसेज करून “प्लिज चुकून आलेत, परत पाठवा” असं सांगतोय. नशीब तो भाऊ अलर्ट होता म्हणून वाचला नाहीतर त्याचे खाते “साफ” झाले असते एक सेकंदात ! तर हे काय स्कॅम आहे ते पाहूया. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी जसे रॉन्ग नम्बर कॉल लागायचे तसे आता गुगल पे / युपीआय हे सगळे बँकिंग डिटेल्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हीच लिंक केलेले असते. त्यामुळे जसे रॉन्ग नम्बर कॉल लागायचे तसे काहीवेळा रॉन्ग नम्बर कॅश फॉरवर्ड होऊ शकते ! एखादा नम्बर इकडं तिकडं चुकला की भलत्याच माणसाला तुमचे पैसे जातात आणि मग परत मागत बसावे लागते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर हॅकर लोकांनी नवीन हा सापळा रचला आहे. ते बळेच हजार दीड हजार रुपये तुमच्या खात्यात जमा करतात आणि नंतर मेसेज करून पैसे परत पाठवा म्हणतात ! मात्र हे करताना ते तुमची खात्री पटावी म्हणून एक लिंक पाठवून सांगतात की “वाटलं तर या लिंक ला क्लिक करून माझ्या बँक खात्याला चेक करू शकता, माझ्या खात्यातुन तुम्हाला पैसे गेले आहेत” अभावीतपणे खरेखोटे चेक करण्यासाठी तुम्ही त्या लिंकला क्लिक करायला जाता आणि दोन चार सेकंदात उलट तुमचेच खाते साफ केले जाते ! असा हा नवीन स्कॅम आहे. मात्र मी इतकंच म्हणेन की सावध राहा ! डीडी क्लास : मग आता यावर उपाय काय ? तर सोप्पा उपाय आहे. असे कुणाचे अनोळखी पैसे जरी तुमच्या खात्यात आले तरी एकच करायच की त्या समोरच्याला म्हणायच…. बाबा रे… थेट भेटायला ये…. तुला कॅश परत करतो. ऑनलाईन मी काही करणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here