
नांदगाव : नांदगाव तालुक्यात शनिवारी गारपीट व अवकाळी पाउस झाला, या पावसात अनेक शेतकर्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झ्याले आहे. पावसाने 21 गावातील 2400 हेक्टर क्षेत्रावरील गहू मका कांदा या पिकांना अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे गहू पिकाचे तसेच रांगडा व उन्हाळी कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सलग सहा दिवसांपासून पाचही महसूल मंडळात अवकाळी पाऊस पडत आहे.या मुले शेतकरी हवाल दिल झाला असून शासनाने या परिस्थितीची तात्काळ दाखल घेऊन पंचनामे करून घेणे गरजेचे असल्यामुळे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामा करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत.
या प्रसंगी शेतकर्यानी धीर सोडू नये असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.
