
राज्य : भारतीय सैन्य दलाच्या अग्नि वीर सारख्या मोहिमेत सामान्य नागरिकांचा विशेषता तरुणांचा सहभाग वाढावा तसेच भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी नवीन पिढीच्या मनामध्ये उत्साह निर्माण व्हावा या उद्देशाने आयोजित नो युवर आर्मी अर्थात आपल्या सैन्यदलाबाबत जाणून घ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रदर्शनाच्या उद्घटनाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानी फरांदे,लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल हरी मोहन अय्यर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
