नाशिक : महिला सबलीकरणात कायद्यांची भूमिका कायम महत्वपूर्ण राहिली आहे. जन्मापासून ते थडग्यापर्यंत महिलांना वेगवेगळ्या टप्प्यावर अनेकदा अन्याय अत्याचार शोषणाला सामोरे जावे लागते कायद्याने या सगळ्या समाजविघातक बाबींवर जरब बसलेली आहे.
ज्ञानेश्वरी महिला ग्राम संघ आणि वृक्ष मित्र परिवार परिवार आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अनेकदा महिला कायद्याचा गैरवापर करतात असे विधान केले जाते मात्र हे विधान न पटणारे असून अजून तळागाळातील महिलांना आपल्या करीता असलेल्या कायद्याची पूर्ण माहिती नाही आणि म्हणून या विषयावर जनजागृती करून महिला दिनी एक वेगळा उपक्रम मनेगाव ग्रामपंचायत व वृक्ष मित्र परिवाराने ने राबविला या करिता वृक्ष मित्र परिवाराचे त्यांनी विशेष कौतुक केले याप्रसंगी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. सिन्नर पोलीस स्टेशनं चे महिला व मुलांकरीता सहाय्य कक्षा चे समुपदेशक श्री निवृत्ती आव्हाड व श्रीमती खिल्लारे मॅडम यांना विशेष सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले,