बसवंत गार्डनचे कार्य कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी :- डॉ. भारती पवार

0

पिंपळगाव : बाजारपेठेची बदलती गरज लक्षात घेऊन शेतमालाचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. शेतकरी सधन व सक्षम होण्यासाठी सुरू असलेले बसवंत गार्डनचे प्रयत्न गौरवास्पद, तसेच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
पिंपळगाव बसवंत स्थित बसवंत गार्डनला डॉ. भारती पवार यांनी सदिच्छा भेट दिली. ‘सेवर निसर्गोत्सवा’त आयोजित ‘मिलांज फळांचा महाराजा’ या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि विजेत्यांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी पूर्वा केमटेक’चे कार्यकारी संचालक संजय पवार,ज्येष्ठ कृषितज्ञ डॉ. बी.बी. पवार, डॉ. भास्कर गायकवाड,तहसीलदार शरद घोरपडे साहेब, विजय पवार, सुहास कदम, महेश पाटील, सुनील पाटील, भागवत बाबा बोरस्ते,यतीन कदम, सतीश मोरे, बापू पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here