जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा

0

मनमाड- श्रावस्ती नगर बुद्ध विहार (समाज मंदिर) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक – २.मनमाड विभाग येथे जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला… प्रकल्प अधिकारी आ.श्री. वाकडे सर तसेच मुख्यसेविका शितल गायकवाड मॅडम याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी पुष्पाताई मतकर(म.न.पा.बालवाडी पर्यवेक्षिका ) तसेच संगिताताई बागुल,निताताई लोंढे,सुरेखाताई ढाके ,सरलाताई गोगड तसेच मुख्यसेविका गायकवाड मॅडम उपस्थितीत उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी मान्यवरांचे स्वागत फुल देवुन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी महिला दिनानिम्मित आपल्या मनोगता मधुन स्त्री सक्षम कशी होईल, तीचा संघर्ष कसा सुरू झाला,इतिहासातील स्त्री, आणि आज काळाच्या गरजेनुसार स्त्रीत कसा बदल झाला पाहिजे,वेळ किती महत्वाची असते,,वेळेचं कसं नियोजन करण्यात यावें यावर मार्गदर्शन केले अंगणवाडी सेविका ताई अन्नपूर्णा अडसुळे यांच्या कल्पनेतून सेविकाताई आणि मदतनिस ताईनी 1975 साली सुरू झालेल्या जागतिक महिला दिनाची सुरुवात कशी झाली यावर नाटिका साजरी केली.कार्यक्रमाचें प्रस्ताविक-अन्नपूर्णाताई अडसुळे सुत्रसंचालन – कल्पनाताई जाधव,मान्यवरांची ओळख -सिमाताई चौधरी,अनुमोदन- राजश्रीताई निकम,आभार प्रदर्शन -वैशालीताई कातकाडे यांनी केले. कार्यक्रमाला विशेष सहकार्य भारंबेताई,बनकरताई,वाघताई, मिनाक्षिताई,कांचनताई, वाळकेताई यांनी केले.ह्या वेळी मनमाड मधील सर्व सेविका/मदतनीसताई आरोग्य सेविका उषा लोंढे व एरियातील पालकवर्ग उपस्थित होते.अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here