
नाशिक : दि.10/03/23रोजी मातोश्री रमाबाई महिला मंडळ भगुरच्या वतीने महिला दिन तसेच क्रांती ज्योती सवित्री बाई फुले पुण्यतथीनिमित्त विशेष कार्य्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमूख अतिथी म्हणून धम्मगिरी योग महाविद्यालयाच्या समन्वयक श्रीमती गीताताई गायकवाड यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि इतिहास या बद्दल सविस्तर माहिती दिली आजही महिला वर्गाला अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते त्याकरिता महिलांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या तसेच काही खेळांच्या माध्यमातून महिलांना एकीचे बळ ,स्व विकास संवादाचे महत्व विषद केले.
मंडळाच्या अध्यक्ष व भगुर नगरपालिका माजी अध्यक्ष सौ भारती अनिल साळवे यांनी यावेळी मंडळाच्या वतीने ज्या ज्येष्ठ महिला शारिरीक मानसिक समस्येमुळे कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही त्यांच्या घरोघरी जाऊन सत्कार केल्याचे संगीतले. मीनाताई साळवे यांनी सूत्रसंचलन केले तर इंदिरा पवार यांनी उपस्थित महिलांचे रुमाल पुष्गुच्छ देऊन आभार मानले.भगुर् शहर शिवसेना अध्यक्ष ठाकरे गट श्री विक्रम सोनवणे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
