मेगा पॅकेज ब्लूप्रिंट / 8 कोटी प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांत प्रत्येकी 5 किलो गहू किंवा तांदूळ, एक किलो हरभरा मोफत देणार -अर्थमंत्री

0

नवी दिल्ली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या ब्रेकअपचा दुसरा टप्पा सांगितला. यावेळी सीतारमण यांनी, प्रवासी मजुर, स्ट्रीट वेंडर, लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या. पहिल्या टप्प्यात लहान व्यवसायिक, रिअल एस्टेट, संघटित क्षेत्रातील वर्कर आणि इतर लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या.

ब्रेकअप पार्ट-2 चे महत्वाचे पॉइंट

शेतकरी

 • शेतकऱ्यांसाठी इंटरेस्ट सब्वेंशन स्कीमला 31 मे पर्यंत सुरू ठेवणार.
 • मार्च-एप्रिलमध्ये 63 लाख कृषी कर्ज देण्यात आले. हे 86 हजार 600 कोटींचे होते. यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला.
 • पिकांच्या खरेदीसाठी राज्यांना दिली जाणारी आर्थिक मदत 6700 कोटी रुपये केंद्र सरकारने वाढवली. ग्रामीण भागांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी 4200 कोटी रुपये दिले.

प्रवासी मजुर

 • कोरोनादरम्यान नागरिकांसाठी शेल्टर होमची व्यवस्था केली.
 • अर्थमंत्री म्हणाले की, आम्ही अप्रवासी मजुरों, गरीब आणि गरजुंना डोळ्यासमोर ध्यानात ठेवत आहोत. लॉकडाउनच्या घोषणेनंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा करण्यात आली. आम्ही सतत नव-नवीन घोषणा करत आहोत. 3 कोटी शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. त्यांनी 4 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले.
 • ज्या प्रवासी मजुरांना आपल्या राज्यात जायचे आहे, त्यांच्यासाठी योजना आहेत. यावर आतापर्यंत 10 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याअंतर्गत 1.87 हजार ग्राम पंचायतींमध्ये काम सुरू आहे.
 • जे प्रवासी आपल्या घरी जात आहेत, ते तिथेच रजिस्टर काम घेऊ शकतील. मनरेगाअंतर्गत मजुरी 182 रुपयांवरुन 200 रुपये करण्यात आली आहे.
 • प्रवासी मजुरांना पुढील दोन महिने 5-5 किलो राश दिले जाईल.
 • 8 कोटी प्रवासी मजुरांसाठी मोफत राशनची सुविधा उपलब्ध करण्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. 5-5 किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो दाळ दिली जाईल. राज्य सरकारांवर याला लागू करण्याची जबाबदारी असेल.
 • प्रवासी मजुर कोणत्याही राशन कार्डने कोणत्याही राज्यातील कोणत्याही राशन दुकानातून राशन घेऊ शकतील. वन नेशन वन राशन कार्ड ऑगस्टपासून लागू केला जाईल. गरीब
 • प्रवासी मजुर आणि शहरी गरीबांसाठी स्वस्त किरायांवर घर देण्याची घोषणा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्ग याला सामील केले जाईल.
 • उद्योगपति आपल्या जमिनीवर असे घर बनवतील, तर त्यांना सुट दिली जाईल. राज्य सरकारांना हे करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. स्ट्रीट वेंडर
 • स्ट्रीट वेंडरला 5000 कोटी रुपयांचे स्पेशल क्रेडिट सुविधा मिळेल. एका महिन्यात सरकार योजना लागू करेल. 50 लाख स्ट्रीट वेंडर्सला फायदा.
 • या योजनेअंतर्गत स्ट्रीट वेंडर्सना 10,000 कोटी रुपयांचा फायदा मिळेल. डिजिटल पेमेंट पावरल्यावर त्यांना बक्षीस मिळेल. ) छोटे व्यापारी
 • मुद्रा शिशु लोनअंतर्गत 50 हजारापर्यंतच्या लोनवर 2% इंटरेस्ट सबवेंशन स्कीम चा लाभ 12 महीन्यांसाठी दिला जाईल. 3 कोटी लोकांना सबवेंशन स्कीमचा फायदा होईल. 23-28 वयातील कोणताही व्यक्ती मुद्रा लोन अंतर्ग अर्ज करू शकतो. सामान्य नागरिक
 • मिडल इनकम ग्रुप, ज्यांचे वार्षिक उत्पन 6 लाख ते 18 लाख आहे. त्यांच्यासाठी अफोर्डेबल हाउसिंग अंतर्गत क्रेडिट लिंक सब्सिडी स्कीम मार्च 2021 पर्यंत वाढवली जात आहे. यामुळे 2.5 लाख लोकांना फायदा होईल.

  रोजगार निर्मिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here