
पेठ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पेठ तालुक्यातील देवगाव येथे 40 कोटीची भव्य एकलव्य मॉडेल रेसिंडेंसियल स्कूल साकारण्यात येणार असल्याने या शाळेमुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय शिक्षणाची दारे खुली होणार असल्याचे केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.पेठ तालुक्यातील देवगाव येथे एकलव्य निवासी शाळेचे भूमिपूजन डॉ. भारती पवार यांचे हस्ते करण्यात आले. आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक असल्याने आदिवासी भागातील विद्यार्थ्याना स्पधेच्या युगात नेतृत्व करण्यासाठीचे आवश्यक शिक्षण या निवासी शाळेतून देण्यात आल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले. पेठ तालुक्यातील शिक्षणाबरोबर रस्ते, वीज, पाणी यासाठी जवळपास दिडशे कोटी रूपयाचा निधी उपलब्ध झाला असून प्रस्तावित सर्व विकासकामे पूर्ण करण्याकडे राज्य व केंद्र शासनाचे पूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.जवळपास साडेदहा एकर जामिनीवर 40 कोटी रूपये खर्च करून 6 वी ते 12 वी च्या 480 विद्यार्थ्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी मुलांचे भविष्य घडविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस सुनिल बच्छाव, पंचायत राज व ग्रामीण विकासचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत भदाणे,रामदास वाघेरे, तालुकाध्यक्ष संजय वाघ, सदाशिव गावीत, काशिनाथ भडांगे, दिलीप पाटील, विशाल जाधव, विजय देशमूख, देवराम गायकवाड, त्र्यंबक कामडी, सागर डोगमाने, छगन चारोस्कर,संगिता सहारे, गणेश गवळी, यादव राऊत, राजेंद्र गवळी, लताबाई गायकवाड, रमेश गालट, सुरेश भिवसन, चंद्रशेखर काळे, चिंतामण महाले, पंडीत दुगल, पांडूरंग फडवळ, गीता जाधव, मनोहर बेंडकुळे, अरुण पागी यांचे सह पेठ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सरपंच कार्यकर्त नागरिक सर्व शासकिय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
