अंगणवाडी कर्मचारीच्या मानधनात राज्यसरकार ने 20 टक्के वाढ जाहीर

0

नांदेड : अंगणवाडी कर्मचारीच्या मानधनात राज्यसरकार ने 20 टक्के मानधनात वाढ केल्या नंतर नांदेड जिल्हातील अंगणवाडी नंबर 12 खुदवेनगर या अंगणवाडीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाप्रमुख शततारका कातकाडे यांचा सर्व खुद्द बे नगर ड विभागातून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका कडून सत्कार करण्यात आला, त्यावेळी संगीता विश्वनाथराव मैड वअंगणवाडी सेविका व मदतनीस हजर होत्या.
राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर होत्या. अंगणवाडी सेविका थेट रायगड किल्ल्यावर पोहोचल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर आंदोलन केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला होता. अंगणवाडी सेवाकांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा झाली आहे.सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार, मात्र त्यात कर्मचार्यांच्या व सरकार यांच्या सहभागाने ती होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले जाणार असल्याचेही या बैठकीत ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here