रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले युवक आघाडी चा मनमाड ला आनंदोत्सव

0

मनमाड – नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्वबळावर विजयी झाले.७० वर्षा नंतर रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया चे २ उमेदवार निवडून आले आहे.त्यानिमित्त मनमाड शहरामध्ये विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आर.पी.आय (आठवले) उत्तर महाराष्ट्र युवा नेते मा.वंदेशजी गांगुर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच फटाके फोडत मिठाई वाटप करुन जल्लोष साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यापारी आघाडी मनमाड शहराध्यक्ष संजयजी मुनोत, समाजसेवक राजाभाऊ भाबड,अनिलशेठ गुंदेचा, दिपक उबाळे (मा.नगरसेवक ),गुलाबराव संसारे, जेष्ठ नागरिक रामनाथ ढेंगळे,राजाभाऊ सपकाळे,युव नेते दिपक साळवे,युवा नेते रवी बनकर ,दिलिप भालेराव, राजाभाऊ हॅन्डरी,एकनाथ गायकवाड, आदिल सह असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here