धनगर समाजातील मेंढपाळांना जमीन खरेदी करण्यासाठी तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे आमदार राजळेंची विधानसभेत लक्षवेधी सुचना

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) धनगर समाजातील अनेक भुमिहीन मेंढपाळ सहा-सात महीने विस्थापित होउन मेंढीपालनासाठी इतर राज्यात,जिल्ह्यात, जातात.मेंढीपालनासाठी धनगर समाज स्थलांतरित होउ नये म्हणून बंदिस्त अथवा अर्ध बंदिस्त मेंढीपालन करण्यासाठी त्यांना जमीन खरेदी अथवा जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे अशी लक्षवेधी सुचना अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली.तसेच स्थलांतरित मेंढपाळांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा. आणि प्रत्येक तालुक्यात लोकर विकास कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षण अथवा यंत्रसामुग्री साठी सरकारी योजने अंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी राजळे यांनी केली.धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या त्या एकमेव मराठा आमदार आहेत.खासदार फौजीया खान यांनी केंद्रात आणि श्रीमती आमदार राजळे यांनी राज्यात धनगर समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. अनेकांनी फक्त धनगरांची मते मिळवण्यासाठी धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर झुलवत ठेवले आहे परंतु खान आणि राजळे या दोन्ही भगिनींना धनगर समाजाची होणारी ससेहोलपट याची प्रत्यक्ष जाणीव झालेली आहे म्हणून त्या धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी अहोरात्र झगडत आहेत. आमदार राजळे यांनी शेवगाव-पाथर्डी येथील नवीन तहसील कार्यालयातील फर्निचर खरेदी करण्यासाठी निधी,पाथर्डी न्यायालयाची नवीन इमारत उभी करण्यासाठी निधी, मागील वर्षी म्रुत्यु पावलेली जनावरे यांची नुकसान भरपाई, पावसाळ्यात पडलेली घरकुल, शेती, गायगोठे यांची नुकसान भरपाई, पिकविमा भरपाई,शेतकऱ्यांना दिवसा लाईट,आणि मागेल त्याला सौर ऊर्जा क्रुषीपंप,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे आंदोलन या अशा अनेक विविध विषयावरील प्रश्नांची मांडणी करीत विधानसभा सभाग्रुह दणाणून टाकले होते.संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजात राजळे यांच्या लक्षवेधी सुचनेने समाधानाचे वातावरण पसरले आहे.स्व.ना. गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर आमदार राजळे यांनी धनगर समाजाच्या प्रश्नावर विधानसभा गाजवली आहे. ( थेट महाराष्ट्र विधानसभेतून प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here