मनमाड नगर परिषद शाळा इमारत नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

0

मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत नांदगाव व मनमाड शहरातील नगरपरिषद शाळा इमारतींच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.मनमाड शहरातील विविध नगरपरिषद शाळांना भेट दिल्यानंतर शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे दर्शनास आले तसेच इमारत परिसरात सुशोभीकरण करणे व उत्तम वातावरण असणे गरजेचे असल्याचे संकल्पना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे मांडली असता या विषयाची तात्काळ दखल घेत निधीसाठी पाठपुरावा केला असता नगर विकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेत मनमाड सह नांदगावच्या नगरपरिषद शाळांना एकूण दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
भूमिपूजन झाले असून लवकरच शाळांचे नूतनीकरण करण्यात येईल आणि स्वच्छ सुंदर असलेल्या इमारतीत शिक्षण घेण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होईल. असे सौ.अंजुमताई कांदे यांनी सांगितले. विविध शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी स्वागत केले. आमदारांच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या शाळांच्या इमारत नूतनीकरणाबद्दल शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आभार मानले याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे, मनमाड शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, बांधकाम विभागाचे खैरनार साहेब, शिक्षण अधिकारी चंद्र मोरे मॅडम, महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप मनमाड शहर प्रमुख संगीताताई बागुल, नाझमा मिर्झा, मोहिनी ताई राजाभाऊ अहिरे,मंदाताई भोसले,शाहीन शेख, सरला गोगळ, अलका कुमावत, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे,डॉ.वर्षा झाल्टे,गालिबभाई शेख, आमीन पटेल, वाल्मीक आप्पा आंधळे, अज्जू भाई शेख,लाला नागरे, दिनेश घुगे,गोविंद रसाळ, धिवर बाबुजी, रुपेश आहीरे, रविभाऊ खैरनार ललित रसाळ, गोकुळ परदेशी, अमजद पठाण, मिलिंद उबाळे, लोकेश साबळे, सचिन दरगुडे, आनंद दरगुडे,अजिंक्य साळी, राहुल साबळे दीपक जोरणे, विलास परदेशी मोहसीन पठाण मजहर खान अरबाज शेख निसार पठाण चैतन्य परदेशी जमीर शेख, आसिफ भाई शेख, जय अहिरे, जॉनी जॉर्ज, प्रमोद अहिरे,विलास परदेशी,अज्जू पठाण,नितीन राजपूत,बाजीराव चव्हाण, अर्जुन सोनवणे ,संदीप निकम,गुलाब जाधव,आनंदा गवळी, नितीन वामने, निलेश व्यवहारे, कुणाल विसापूरकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here