जे जे चॅलेंजर्स बॉम्बे टायगर फुटबॉल शिलेदारांची यशस्वी घोडदौड.

0

मुंबई – भायखळा (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) मुंबई ऑल इंडिया नॅशनल फुटबॉल टूर्नामेंट नागपूर, वणी जिल्हा येथे पार पडलेल्या टूर्नामेंट मध्ये सर जेजे समूह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मुलांनी सहभाग घेतला होता. त्यात दिल्ली बरोबर २-४ च्या अटीतटीच्या सामन्यात सर जेजे रुग्णालया कर्मचारी मुलांनी उत्कृष्ट खेळ करीत उपविजेता पदाची ट्रॉफी पटकावली. संघाचे यशस्वी मुख्य प्रशिक्षक चव्हाण छगन मनीलाल व तुषार चव्हाण यांनी अतोनात मेहनत घेऊन या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर उप विजेते पद प्राप्त करून जे जे रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. खेळाडूंच्या या कामगिरीमुळे मा अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला व यावर्षी मुंबई फुटबॉल असोसिएशन MFA मध्ये सुद्धा जे जे चॅलेंजर्स बॉम्बे टायगर या नावाने भाग घेऊन आम्ही नक्की यशस्वी होऊ असे गौरवोद्गार काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ अरुण राठोड, प्रशिक्षक छगन चौहान व तुषार चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here