“राष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन.

0

मुंबई (लालबाग-परळ-प्रतिनिधी महेश्वर तेटांबे) आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे यंदा प्रथमच “राष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन करण्यात आले असून. या महोत्सवमध्ये भारतातील कुठल्याही भाषिक लघुपट पाठवू शकतात. फक्त मराठी व हिन्दी लघुपट वगळता इतर भाषिक लघुपटांना ” ईंग्रजी सबटायटल्स” असणे बंधनकारक आहे. या लघुपट महोत्सवमध्ये जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०२२ च्या दरम्यान चित्रित झालेले लघुपट भाग घेवू शकतात. या महोत्सवमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२३ असून सर्वोत्कृष्ट तीन लघुपट अनुक्रमे
१) प्रथम – २५०००/- आणि ट्रॉफी
२) द्वितीय – १५०००/- आणि ट्रॉफी
3) तृतीय – १००००/- आणि ट्रॉफी
4) विशेष ज्युरी – ५०००/- आणि ट्रॉफी
आणि इतर भरघोस रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देवून प्रतिष्ठित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच भाग घेणाऱ्या सर्व लघुपटांना प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. अधिक माहितीकरता आर्यारवी एंटरटेनमेंटचे आयोजक श्री.महेश्वर तेटांबे (संपर्क – 9082293867), श्री.अनंत सुतार (संपर्क – 8879296636), श्री.सुरेश डाळे (संपर्क – 8355891218) आणि श्री.मनिष व्हटकर (संपर्क – 9969920828) यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तसेच समारंभाची तारीख १० दिवस अगोदर कळविली जाईल असे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

आयोजक
आर्यारवी एंटरटेनमेंट
8879810298

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here