
नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख परमपूजनीय गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपस्थिती दर्शवली व सर्व शेतकरी बांधवांना यावेळी संबोधित केले.तसेच कृषी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली, या प्रदर्शनाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी यावेळी केले.
