
नाशिक : रयत शिक्षण संस्थेच्या “संत हरिबाबा विद्यालय पांगरी सिन्नर नाशिक” येथे नुकताच PACE पुणे द्वारा व्यसन विरोधी कार्यक्रम राबविण्यात आला यावेळी धम्मगिरी योगा महाविद्यालयाच्या समनवयक व मनोधार सामाजिक संसंस्थेच्या अध्यक्ष गीताताई गायकवाड यांनी PACE ग्रुप पुणे द्वारा निर्मित पाव्हर पॉईंट शो व डॉक्यूमेंट्री 8 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना दाखवून व्यसन म्हणजे केवळ दारू, गुटखा नव्हे तर सोशल मीडिया मोबाईल यांच्या अतिरेकी वापरा मुळे शालेय विद्यार्थ्यांच्या घसरणाऱ्या गुणवत्ता श्रेणी परिणाम , कुटुंबातील व्यक्ती शिक्षक यांच्या सोबत हरवलेला संवाद याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रम पांगरीचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर पांगरीकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आला होता यावेळी ज्ञानेश्वर पांगरीकर यांनी सर्व शाळा महाविद्यालयात असे कार्यक्रम घेणे आवश्यक असल्याचे सांगितले कार्यक्रम यशस्वीतेकरिता सौ पुष्पा ताई वडजे नाशिक यांनी विशेष परिश्रम घेतले तर संत हरि बाबा शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंदानी कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल PACE ग्रुप पुणे चे आभार मानले,
