
राज्य : वार्षिक परीक्षेआधीच्या तणावातून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी आज परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत ऑनलाईनद्वारे हा कार्यक्रम पाहिला. तसेच यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा हा उत्सव असून त्यातून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नाही, असा संदेश देऊन पंतप्रधान मोदीजी यांनी मुलांच्या मनात आत्मविश्वासाचे बीज रुजविले. अभ्यास कसा करावा, तणावाचा सामना कसा करावा,पालकांनी विद्यार्थांशी कसे वागावे, याबाबतही मोदीजींनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले असेही डॉ.भारती पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक आर. डी. दरेकर,उपमुख्याध्यापक डॉ. भदाणे, डॉ. जाधव,भागवत बाबा बोरसे,यतीन जी कदम,बापू पाटिल,अल्पेश पारख,किशोर कदम,योगेश तिडके,योगेश चौधरी, पगार सर,उमेश कुलकर्णी,तानाजी वाघ,विद्यार्थी,शिक्षकवृंद व पदाधिकारी उपस्थित होते.
