
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
वै.आश्रू गंगाराम निकम यांच्या प्रेरणेने आणि ह.भ.प. रामहरी महाराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र घोटण येथे धर्मनाथ बीजेनिमित्ताने किर्तन महोत्सव आणि नवनाथ पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि.१६ ते२३ जानेवारी या काळात या महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्व ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर,विशाल महाराज खोले,कल्याण महाराज काळे,रामहरी महाराज निकम,उमेश महाराज किर्दत,अनिल महाराज तुपे, समाधान महाराज भोजेकर,या महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तने झाली. दि.२२जानेवारी रोजी सायंकाळी संपूर्ण गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. आणि शेवटी ह.भ.प.अक्रुर महाराज साखरे यांच्या रसाळ वाणीतून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.ह.भ.प. रामराव महाराज घनवट यांच्या सुमधुर वाणीतून दररोज सायंकाळी ३ते५ या वेळेत भावार्थ रामायणाची पुष्पांजली अर्पण करण्यात आली.आळंदीतील सर्व ह.भ.प.अनिकेत महाराज बांगर,नितीन महाराज परभणे,महादेव महाराज होंडे,कल्याण महाराज सावळे,भागवत महाराज हुलगे,ओंकार महाराज पाटील, सागर महाराज पठाडे,अक्षय महाराज नागवडकर, अर्जुन महाराज तनपुरे, हनुमान महाराज मुंडे,क्रुष्णा महाराज गुंड,सार्थक महाराज खोमणे यांनी साथ संगत केली.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विणापुजन,सदाशिव बन विणेकरी, आणि पारायण -शिवाजी क्षिरसागर, संजय दौंड, कल्याण मोटकर,महादेव मोटकर यांनी केले. गोरक्ष घुगे यांनी पहारा केला. मंडप व्यवस्था ज्ञानेश्वर शिंदे यांनी तर साउंड शिष्टीम केशवदादा मोरे यांनी दिली.घोटण ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक यांच्या सहकार्याने हा भव्यदिव्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.न भुतो न भविष्य ती अशी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.काल्याच्या महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.जातपात विसरून सर्व जातीधर्माचे भाविक भक्तगण या सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यामुळे या धर्मनाथबीज सोहळ्यात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले.हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकासाठी एक धार्मिक पर्वणीच ठरला होता.
(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर).
