व्हॉटसअप घोटाळयास बळी नका – ॲड. चैतन्य भंडारी

0

धुळे : जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – जगभरात व्हॉटस अॅप या अॅप्लीकेशनचा बहुतांश नागरीक दैनंदिन वापर करीत असतात. याचाच सायबर गुन्हेगार एका वेगळ्या पध्दतीने गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगार बेरोजगारी, टाळेबंदी, आणि लोकांच्या अतिरिक्त उत्पन्नचा फायदा घेत आहे, जसे की ५० रुपये एका यु टयुब व्हिडीओला लाईक केल्याबद्दल मिळवा. हे सायबर गुन्हेगार व्हॉटस अॅप, लिंक्डइन, अगदी फेसबुक सारख्या सोशल मिडियाचा वापर करुन पिडीतांना सहज पैसे देण्याचे आमिष दाखवतात आणि असे देखील भासवतात की दर दिवशी ५००० रुपये एका यु टयुब व्हिडीओला लाईक करुन तुम्ही मिळवू शकतात. या सर्व गोष्टींसाठी ते तुमची खाजगी माहिती देखील विचारतात आणि काही वेळेस ते तुम्हाला काही डिपॉझीट रक्कम देखील भरण्यास सांगतात. म्हणून तरुण मंडळींनी अशा फसव्या मॅसेजला बळी पडू नये व असे कोणतेही नोकरी नसते जी तुम्हाला घरी बसल्या एका लाईकने प्रतिदिन ५००० हजार रुपये मिळवून देवू शकते म्हणून अशा कोणत्याही मॅसेजला प्रतिसाद देवू नका, आपली खाजगी माहिती कुणालाही शेअर करु का व अश कोणत्याही फसव्या लिंकवर करु नका, असे आवाहन सायबर तज्ञ आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here