
दिल्ली : नवी दिल्ली येथे 26 जानेवारी निमित्ताने होणाऱ्या संचलनासाठी भगूर येथील वेदांत संग्राम गायकवाड यांची निवड झाली आहे.वेदांत नाशिकरोड बिटको महाविद्यालयात SY BCOM
शिकत असून त्यांचे वडील संग्राम एकनाथ गायकवाड हे राष्ट्रीय पातळीच्या खेळाडूंना तसेच पोलिस आर्मी भरती करीता तरुण तरुणींना अनेक वर्षांपासून मार्गदर्शन करीत आहे त्यांच्या आई वंदना संग्राम गायकवाड हया श्री वासुदेव इंग्लिश मिडीयम स्कुलच्या शिक्षिका आहेत. वेदांत च्या निवडी बद्दल प्राचार्य मंजुषा कुलकर्णी ,छात्र सेना अधिकारी ANO फ्लाईंग ऑफिसर आकाश ठाकूर Co ग्रुप कॅप्टन संग्राम नाईक यांनी विशेष कौतुक केले आहे.नाशिक जिल्ह्यातुन एकमेव निवड झाल्या बद्दल संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील NCC कॅन्डीडेट विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.धम्मगिरी योग महाविद्यालयाच्या समन्वयक मनोधार सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती गीता गायकवाड यांनी वेदांतच्या परती नंतर विशेष गुण गौरव समारंभाचे आयोजन केले आहे.
