
केरळ: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केरळ दौऱ्यात राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन केरळच्या आरोग्य विषयक विविध उपक्रम आणि समस्यांवर यावेळी चर्चा केली. केंद्र सरकारच्या विविध आरोग्य उपक्रमांचे लाभ जनतेला मिळावेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले. माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली,केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात केरळ राज्याला कोविड 19 महामारीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि राज्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 2000 कोटींहून अधिक निधी दिला आहे असेही त्यांनी सांगितले.
