0

अहमदनगर  (सुनिल नजन/अहमदनगर)संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्रीक्षेत्र कानिफनाथ गडाचे आम्ही पदाधिकारी नाही तर नोकर आहोत असे उदगार मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष बबनराव उर्फ राधाकिसन मरकड यांनी काढले ते ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांच्या सन्मान सोहळ्या प्रसंगी बोलत होते.ते पुढे म्हणाले की ज्यांनी ज्यांनी चुका केल्या त्यांना कानिफनाथांनी बाजुला केले आहे. भविष्यात आमच्याही हातुन काही चुका नकळतपणे झाल्या तर त्या आम्हाला समजावून सांगा आम्ही त्यामध्ये निश्चितपणे सुधारणा करू अशी ग्वाही कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बबन उर्फ राधाकिसन मरकड यांनी दिली. पाथर्डी तालुक्यातील एका नाथभक्त पत्रकाराने गडास देणगी म्हणून एक्कावन हजाराचा धनादेश नवीन अध्यक्ष यांच्याकडे सुपुर्द केला. या पत्रकार सन्मान सोहळ्यामध्ये जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, सुनिल नजन,हरिहर गर्जे, वजिर शेख,संदिप शेवाळे,अमोल म्हस्के, राजेंद्र सावंत, बाबासाहेब गर्जे,अमोल कांकरिया, नितीन गटाणी,अजय गांधी,संदिप शेवाळे,बाबासाहेब गर्जे, नारायण पालवे,यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे सहसचिव अँडहोकेट शिवजीत डोके, कोषाध्यक्ष भाउसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे,शामराव मरकड, डॉ. विलास मढीकर,व्यवस्थापक संजय मोहन मरकड हे उपस्थित होते. (प्रतिनिधी, सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here